जय बाबाजी भक्त परिवारातील तीन संत २१ दिवसाच्या देशव्यापी दौऱ्यावर

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) परमपूज्य बाबाजींच्या परंपरेचा प्रचार प्रसारासाठी जय बाबाजी भक्त परिवारातील तीन संत २१ दिवस देशव्यापी दौऱ्यावर निघाले आहे. सून जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या तीन संताचे पूजन करून त्यांना दौऱ्यासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान बाबाजींच्या परंपरेचा हे तीन संत प्रचार व प्रसार करणार आहे.

जगद्गुरु श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणाच्या २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सोहळ्याच्या पर्व काळावर जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य परंपरेतील तीन संत ब्रह्मचारी विवेकानंद महाराज, नागेश्वर नंद महाराज व अविर मुक्तेश्वर महाराज हे २१ दिवसांसाठी भारतातील सर्व राज्यांमध्ये हिंदू संस्कृती जगाच्या पाठीवर कशी श्रेष्ठ आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही हजारो वर्ष पूर्वीची सनातन संस्कृती या संस्कृतीचे पालन संपूर्ण भारत देशासह जगाने हीचे अवलोकन करावं वसुदेव कुटुंबकम हे विश्वचि माझे घर हा माऊली ने दिलेला संदेश सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये व आपल्या भारत भूमीमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रांतवाद सीमावाद जातीयवाद धर्मवाद हे सर्व विसरून हिंदू संस्कृती अंगीकृत करून या भारत भूमीसाठी सर्वांनी एक होण गरजेचे आहे.

 महाराष्ट्रातील थोर संत परंपरेतील संत ब्रह्मलीन जगद्रूरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी ज्या महत्त्वाच्या परंपरा समाजाला दिल्या आहे यामध्ये अनुष्ठान श्रमदान गोसेवा कृषी सेवा ऋषी सेवा गुरुकुल या परंपरेचा देशभर प्रचार प्रसार करणे त्यांनी घालून दिलेले चार तत्वे पर अन्न परधन परनिंदा व परश्री याचा त्याग करून आपले जीवन देशासाठी धर्मासाठी समर्पित करणे विद्यमान जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देशी पशुधन पारंपारिक सेंद्रिय शेती व आजचा बालक उद्याचा राष्ट्रचालक या भावनेने बालवयात संस्कार पिढी घडवणे, हा विचार सुद्धा देशपातळीवर

याचा प्रचार प्रसार होणे, भावी पिढी आरोग्याच्या व बौद्धिक दृष्टीने सक्षम कशी होईल हा जगदुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज यांची तत्वे देशभर प्रसार व्हावा या पवित्र विचाराने २१ दिवस ही देशव्यापी यात्रा आज पासून भारतातल्या सर्व राज्यांमध्ये जाणार आहे यामध्ये ब्रह्मचारी विवेकानंद महाराज यांच्याकडे बिहार, झारखंड, मनिपुर, त्रिपुरा, नागालैंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम या नऊ राज्याची जबाबदारी दिलेली आहे दूसरे संत ब्रह्मचारी नागेश्वर नंद महाराज यांच्याकडे मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश दिल्ली व महाराष्ट्र या अकरा राज्याची जबाबदारी दिलेली आहे.

तिसरे संत ब्रह्मचारी अविर मुक्तेश्वर महाराज यांच्याकडे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ गोवा छत्तीसगड उडीसा पश्चिम बंगाल या राज्याची जबाबदारी दिलेली आहे. हे तिन्ही संत वेगवेगळ्या चार चाकी वाहनातून ज्याला रथाचे स्वरूप दिले आहे. संपूर्ण भारतामधील महत्वाची देवस्थाना हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या सर्व संघटना त्या राज्यातील सामाजिक राजकीय व्यक्ती व देशभरातील सामान्य नागरिक यांची भेट घेऊन परमपूज्य बाबाजीच्या परंपरा भारतीय संस्कृतीचे महत्त्व याचे जतन व संवर्धन हे आपल्या पवित्र मायभूमीला कसे तारू शकते आणि या विचाराने येणाऱ्या काळामध्ये जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून आपला देश कसा उद्याला येऊ शकतो हे राष्ट्रहिताचं कार्य त्यांच्या हातून जगदुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २१ दिवसांमध्ये होणार आहे.

भारत यात्रा मोहिमेचा शुभारंभ श्रीक्षेत्र वेरूळ येथे स्वामी शांतिगिरी महाराज व महाराष्ट्रातील प्रमुख जय बाबाजी भक्त परिवारातील उपस्थितीमध्ये झाला. ओम जगदुरु जनशांती धर्म सोहळा समितीचे राजेंद्र पवार शिवा अंगुलगावकर यांच्यासह सर्व आश्रमी संत व जय बाबाजी भक्त परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.